Recents in Beach

Abhanga 2341 Marathi

 


Original abhanga in Marathi Meaning:


असा जी सोंवळें । आहां तैसे चि निराळे ॥१॥ आम्हीं नयों तुमच्या वाटा । काय लटिका चि ताठा ॥ध्रु.॥ चिंतन चि पुरे । काय सलगी सवें धुरे ॥२॥ तुका म्हणे देवा । नका नावडे ते सेवा ॥३॥  
 
देवा तू कितीही सोवळा असलास तरीही किंवा सर्वांपेक्षा कितीही निराळा असलास तरीही आता काही आम्ही तुमच्या वाटेला येणार नाही कारण तुम्ही उगाच ताठ्यात असता आणि तुमचा तोताठा किती लटका आहे हे देखील आम्हांस ठाऊक आहे.  आम्ही यापुढे तुमच्या पायांशी काहीही सलगी वगैरे करणार नाही उगाच तुमच्याशी गरज नसताना जवळी साधन नाही तुमचे आमच्या मनी चाललेले चिंतन काय ते आम्हाला पुरेसे आहे 

#TukaramGatha #Abhang #SantTukaram #VitthalBhakti #TukaMhane

Post a Comment

0 Comments