Recents in Beach

Abhanga 2465 Marathi

 असो खटपट । आतां वाउगे बोभाट ॥१॥ परिसा हे विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥ अपराध करा । क्षमा घडले दातारा ॥२॥ तुका म्हणे वेथा । तुम्हा कळे पंढरिनाथा ॥३॥

देवा माझी रोजची खटपट असो आणि व्यर्थ वाउगे बोभाट देखील आता बाजूला राहो, आता तुम्ही माझे एक महत्वाचे बोलणे ऐका. माझे मस्तक आता तुमच्या चरणी राहो, माझ्याकडून मागे जे काही अपघात घडले असतील ते देवाला तुम्ही पोटात घेऊन मला हे दातारा क्षमा करा एकदा काय ते मला माफ करा हे देवा पंढरीनाथा तुला तर वेगळे काय सांगणार तुला माझ्या मनाची व्यथा कळत नाही का

Post a Comment

0 Comments