Recents in Beach

Abhanga 2992 Marathi

 

Original abhanga in Marathi Meaning:आजिवरी होतों संसाराचे हातीं । आतां ऐसें चित्तीं उपजलें ॥१॥ तुला शरणागत व्हावें नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥ध्रु.॥ विसरलों काम याजसाठीं धंदा । सकळ गोविंदा माझें तुझें ॥२॥ तुका म्हणे विज्ञापना परिसावी । आवडी हे जीवीं जाली तैसी ॥३॥ 

ते म्हणतात मी आजवर केवळ संसाराच्या अधीन होतो, त्याच्या हाती सापडलो होतो परंतु माझ्या चित्तात आता एक गोष्ट आली आहे की सर्व बाजूला सारून तुला आता सर्वार्थाने शरण जावे, यापुढे केवळ तुझीच सेवा करावी. किंबहुना माझ्या मनानेच आता तसे घेतले आहे त्यामुळे हे देवा तू देखील आता माझा दिनाचा स्वीकार करावा, माझा संपूर्ण अंगीकार करावा, ते म्हणतात हे देवा मला तुझी आता एवढी आवड लागली आहे की यासाठी मी माझा सर्व कामधंदाच बाजूला ठेवला आहे किंबहुना मी तो पूर्णपणे विसरलोच आहे, कारण आता मला येथे तुझ्या-माझ्याशिवाय दुसरे काहीही नको, आपल्या दोघांत मला आता कोणीही तिसरा नको. 
तुकोबाराय शेवटी देवाला म्हणतात की देवा तुम्ही कृपा करून माझी ही विज्ञापना परिसावी, माझी व्याकुळतेने भरलेली ही विनंती ऐकावी, माझ्या जीवाला जशी आवड होत आहे मी तुम्हांला तेच सांगत आहे.

#TukaramGatha #Abhang #SantTukaram #VitthalBhakti #TukaMhane

Post a Comment

0 Comments